Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार
Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार
Vachan Badla in Marathi: नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील ‘वचन‘ हा विषय अभ्यासणार आहोत तसेच वचनाचे काही महत्वाचे नियम जाणून घेणार आहोत.
नामाच्या रूपावरून एखादी गोष्ट एक आहे की अनेक आहेत याचा अर्थबोध ज्या शब्दावरून होतो त्यास वचन असे म्हणतात.
शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये Vachan Badla in Marathi विषयावर अनेकदा प्रश्न विचारला जातो परंतु अचूक माहिती नसल्याने विद्यार्थी हातातले गुण गमावून बसतात.
चला तर आज आपण Marathi Ek Vachan Anek Vachan बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेवूयात जेणेकरून तुम्हाला अगदी सहजपणे गुण मिळतील |
वचनाचे प्रकार | Ek Vachan Anek Vachan
Ek Vachan Anek Vachan in Marathi: मराठीमध्ये वचनाचे दोन मुख्य प्रकार पडतात.
1. एकवचन (Ek Vachan) – नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एकवचन असे म्हणतात. (नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते).
उदा. झाड, मुलगा इ, चिमणी.
2. अनेकवचन (Anek Vachan) – वस्तु एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते त्याला त्या नामाचे अनेकवचन किंवा बहुवचन असे म्हणतात.
उदा. घोडे, झाडे इ, आरसे.
वचनाचे नियम | Vachan Badla in Marath
मराठीमध्ये वचन बदलताना काही नियम दिले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहेत. (काही अपवाद सुद्धा आहेत त्यामुळे नियम आहे तसा लागूच झाला पाहिजे असं नाही).
चला तर हे महत्वाचे नियम जाणून घेऊयात | | Vachan Badla in Marathi
धातू वाचक नामाचे अनेकवचन होत नाही. (उदा. सोने, चांदी, पितळ, शिसे, रुपे)
नातेवाईकांचे देखील अनेकवचन होत नाही. उदा. काका, मामा
सामान्य नामाचे आणि समूहदर्शक नामाचे अनेकवचन होते. उदा. मुलगा, नदी, थवा, समिती
पदार्थवाचक, भाववाचक, आणि विशेषणाम यांचे अनेकवचन होत नाही. (उदा. पदार्थवाचक शब्द – तेल, तूप, गहू. भाववाचक नाम – सौंदर्य, गरीबी. विशेषणाम – हिमालय, गंगा |
विशेषनाम आणि भाववाचक नाम जर सामान्य नामाप्रमाणे काम करत असेल तर अनेकवचन होऊ शकतो |
एखादी व्यक्ति वयाने, अनुभवाने, ज्ञानाने आपल्यापेक्षा थोर असेल तर आपण त्यांना अनेकवचनाने संबोधतो. (उदा. ताईसाहेब उद्या माहेरी जातील., राष्ट्रपति राज्यात दौर्यानिमित्त आले आहेत |
Post Comment